![]() |
DARK SIDE OF STATUS |
स्टेटस खालील प्रमाणे असतात.
3.मित्र, नातेवाईक घरातील व्यक्तींचे वाढदिवस.
4.एखादी व्यक्ती मृत पावल्यास श्रद्धांजली चे..
5.हॉटेल मध्ये गेले तर पदार्थांचे किंवा जेवतानाचे.
6.फिरायला गेले तर प्रवासाचे किंवा भेट दिलेल्या ठिकाणचे.
7.नवीन वस्तू घेतल्याचे.
8.महापुरुषांच्या जयंतीचे, पुण्यतिथी चे..
9.एखादी नवीन व्यक्ती,मित्र भेटल्याचे.
10.लग्न किंवा कार्यक्रमाच्या पत्रिका.
11.काही जण स्वतःचे, फॅमिलीचे फोटो ठेवतात.
12.काही व्यावसायिक जाहिरात करतात
13.सूचना,इशारे
14.सिनेमातील गाणे
15.सुविचार,विचार
16.विनोदी व्हिडिओ.
17.राजकीय
18.आपल्या दैनंदिन सवयी.
आपले स्टेटस कोण कोण पाहत..
1. आपले मित्र
2. आपले नातेवाईक
3. आपले ग्राहक किंवा अशिल
4.काही अनोळखी ….
कुठेतरी एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर आपला तात्पुरता कामापुरता संबंध येतो जसे की काही खरेदी -विक्री असेल किंवा काही बुकिंग,डिलिव्हरी असेल तर आपण त्याचा नंबर सेव करून घेतो तोही आपण नंबर सेव्ह करून घेतो. उदाहरणार्थ..
- जसे की आपण एखाद्या दवाखान्यातील कंपाउंडर किंवा नर्स चा नंबर सेव करून ठेवतो व तेही आपला नंबर सेव्ह करून ठेवतात.
- आपण ज्याच्याकडून रोज दूध,भाजीपाला घेतो.
- आपल्या घरातील भांडी,कपडे धुणारी बाई.
- आपले असे शेजारी ज्यांच्याशी आपला संबंध फारच कमी असतो.
- आपल्या भागातील गॅस,पार्सल डिलिव्हरी वाला.
- एखादा कुकर किंवा शेगडी,इतर उपकरणे दुरुस्त करणारा.
- एखादा बँकेतील कर्मचारी ज्याच्याकडे काही कामानिमित्त आपला नंबर गेलेला असतो
- अचानक प्रवासात एखाद्या बरोबर ओळख होते तो आपल्या भागातील, नातेवाईकाच्या गाववाला,किंवा मित्राचा मित्र असतो आणि गप्पा गप्पातून आपण त्याला आपला नंबर शेअर करतो.
- असे बरेचसे अनोळखी लोक आपले स्टेटस रोज पाहतात ज्यांचा व आपला कधी कधी किंवा एकदाच संबंध आलेला असतो..
वरील पैकी 1 व 2 क्रमांचे स्टेटस पाहणारे ठीक आहेत पण क्रमांक 3 व 4 चे यांचा आपल्या वैयक्तिक स्टेटस शी काहीच संबंध नसतो..तरीही ते पाहतात, कधी कधी त्याला रिप्लाय हि देतात.
आपल्या या दैनंदिन स्टेटस मुळे बऱ्याच जणांना जे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतात त्यांना आपण काय करतो, काय खातो कुठे फिरायला जातो किंवा आपलं राहणीमान कस आहे याबद्दल सर्व माहिती होते व आपण त्यांच्या संपर्कात जरी नसलो तरी ते आपल्याला सहज जवळच्या व्यक्तीप्रमाणे ओळखू शकतात. जे आपले मित्र आणि नातेवाईक आहे त्यांच ठीक आहे पण आपण जर व्यवसायिक असाल किंवा एखादी नोकरी करत असाल तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे आपले ग्राहक किंवा आशिल असतात त्यांचा व आपला संबंध एक प्रकारे औपचारिक असतो. तेही आपले स्टेटस पाहत असतात. आपली लाईफ स्टाईल काय, आपले राहणीमान काय, आपले कुटुंब कसे आहे, आपल्या सवयी..अशी बरीचशी आपली वैयक्तिक माहिती स्टेटस द्वारे त्यांना होते .
काय होतो स्टेटस चा परिणाम
मध्यंतरी हा मेसेज viral झाला होता.
![]() |
REALITY OF STATUS |
1.तुमच्या सुविचार वर आधारित स्टेटसमुळे मित्र, नातेवाईक आपल्या भावना समजू शकतात,पण काहीजण गैरसमज करून घेऊ शकतात. खालील स्टेटस पहा..
![]() |
यावरून चांगला अर्थ ही निघतो,पण काही रोजच्या संबंधातील व्यक्तीसाठी हे एक टोमणे असू शकते. |
2. तुम्ही लग्नाची किंवा कार्यक्रमाची पत्रिका तुमच्या स्टेटसला ठेवली आणि जर चुकून तुमच्या जवळच्या किंवा रोजच्या संबंधातल्या काही व्यक्तींना तुम्ही त्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायचे विसरलात. तर त्याच्या मनात मला मुद्दामहून सांगितलं नाही किंवा निमंत्रण दिलं नाही अशी भावना निर्माण होऊ शकते.
3. कुठे जर फिरायला गेलात आणि एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहिला तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असे काही लोक असतात की ज्यांना ते बरे वाटत नाही किंवा सरळ सरळ ते आपल्यावर जळत असतात. काही आपली ग्राहक असतात आपण नोकरी किंवा व्यवसाय करत असो त्यांना आपण सेवा पुरवत असतो तर त्यांचा असा गैरसमज होऊ शकतो की हे आपल्या जीवावर कमाई करून एवढी ऐश करतात.
4. काही जणांचे स्टेटस वरून त्यांना वाईट अनुभव आला आहे किंवा ते दुःखी आहेत असे लगेच लक्षात येते यावरून तुमची मनस्थिती जवळच्या एखाद्या मित्राच्या किंवा तुमच्या contact लिस्ट मधील सर्वांच्या लक्षात येते.यामध्ये स्टेटस पाहणारे क्रमांक तीन व चार चे येतात ज्यांच्याशी तुमचा संबंध नसतो.
5. कट्टर धार्मिक स्टेटस ठेवले तर इतर धर्मांच्या मित्रांच्या भावनाही दुखावू शकतात.
6. स्टेटस मधून तुम्ही किती श्रीमंत किंवा गरीब आहे याचा अंदाज घेण्याचा काही लोक प्रयत्न करतात त्यामुळे तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात.
7. तुम्ही बाहेर फिरायला गेल्यावर स्टेटस ठेवलं तर त्यातून तुम्ही सध्या नेमके कुठे आहात याचाही पत्ता इतरांना लागू शकतो. माघे फेसबुकला अशाप्रकारे स्टेटस ठेवल्याने काही जणांच्या घरात चोरी झाल्याचेही बातम्या आपण वाचल्या असतीलच.
8.काहीजण मित्रांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांचे फोटो स्टेटस ला ठेवतात. आपल्या कॉन्टॅक्टमध्ये काही असे मित्र असतात की जे आपल्याला एवढे जवळची वाटत नाहीत पण ते आपल्याला खूप जवळचे समजत असतात त्यांच्या वाढदिवसाचे जर आपण स्टेटस ठेवलं नाही तर त्यांना राग येऊ शकतो.किंवा आपण त्याचा फोटो स्टेटसला लावला पण त्याने नाही लावला हि भावना नात्यात दुरावा निर्माण करू शकते.
9.एखाद्याने स्टेटस पहिले नाही,किंवा मुद्दाम पाहून रिप्लाय दिला नाही असा गैरसमज निर्माण होऊ शकतो.
10.तुम्ही जर राजकारणात सक्रीय असाल तर तुमचे राजकीय स्टेटस एखाद्या मित्राला टोमणे वाटू शकतात जो दुसऱ्या पक्षाचा आहे.
वरील मुद्द्यावरून आपल्या असे लक्षात येते की
1.आपल्या टेटस मुळे आपण काही प्रमाणात अडचणीत येऊ शकतो.
2. आपल्या स्टेटस मुळे आपले काही मित्र हळूहळू आपले शत्रू ही होऊ शकतात.
3. आपले ग्राहक किंवा अशील यांच्या आपल्याबद्दल एखादा समज किंवा गैरसमज निर्माण होऊन ते आपल्याला ब्लॅकमेलही करू शकतात.
![]() |
द्विअर्थी स्टेटस |
स्टेटस ठेवावे का नको?
काही वर्षापूर्वी व्हॉटस्अपच नव्हते.नंतर स्टेटस आले.पण आता त्याला
1)My Contact
2)My Contact Exept.. व
1)Only For..
हे ऑप्शन आलेले आहेत. हे ऑप्शन आणण्याची गरज का पडली असेल याचा थोडा तरी विचार करा.आता तर अशा प्रकारचे सेटिंग फेसबुक आणि इंस्टाग्राम ला ही आले आहे. स्टेटस ठेवावे परंतु त्याचा आपल्याला कितपत त्याचा फायदा किंवा नुकसान होईल याचाही विचार करणे गरजेचे आहे.
ठेवताना खालील गोष्टींचा किंवा मुद्द्यांचा नक्की विचार करावा.
1. आपल्या स्टेटस मुळे किंवा कट्टर धार्मिक स्टेटस मुळे इतरांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.
2. सुविचार किंवा विचार त्यावर आधारित स्टेटस ठेवताना त्याची दोन अर्थ निघतात का हे लक्षात घ्यावे व ते ठेवणे कितपत गरजेचे आहे त्याचा विचार करावा.
3. मुलींनी किंवा स्त्रियांनी स्वतःचे फोटो स्टेटसला किंवा फेसबुकला ठेवताना प्रायव्हसी सेटिंग चा योग्य असा वापर करावा जेणेकरून आपल्या फोटो इतर कुणी कॉपी करून त्याचा दुरुपयोग करणार नाही याची काळजी घ्यावी.
4. फिरायला गेल्यानंतर लगेच स्टेटस ठेवण्यापेक्षा नंतर ठेवावे जेणेकरून आपण सध्या कुठे आहोत याची माहिती इतरांना मिळणार नाही किंवा किंवा प्रायव्हसी सेटिंग वापर करावा.
5. आपली ग्राहक किंवा अशील यांना आपले वैयक्तिक स्टेटस दाखवण्याची काही गरज नसते तर अशा वेळेस आपण प्रायव्हसी सेटिंग करून त्यांना ते दिसणार नाही याची आपण योग्य काळजी घ्यावी लागेल.
6. आपल्या भावना दर्शवणारे स्टेटस ठेऊच नये कारण आपल्या भावना ज्यांना समजावे असे एखादी किंवा दुसरी व्यक्ती असेल परंतु त्यामुळे आपल्या भावना या आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील सर्वांनाच कळतात. आपण दुःखी आहोत हे जगाला दाखवण्याची काहीही गरज नाही.
7. आपल्या काही खाजगी बाबी किंवा गोष्टी या आपल्या पुरत्याच मर्यादित असल्या पाहिजे त्या जर इतरांना कळाल्या तर ती आपली कमजोरी ठरू शकते. याचा विचार करूनही स्टेटस ठेवावे. उदा.एखादी सवय किंवा व्यसन.
एकंदरीत
स्टेटस ठेवताना ते कितपत गरजेचे आहे याचा आपण नक्की विचार करावा. आपले स्टेटस कोणी पहावे कोणी पाहू नये यासाठी उपलब्ध प्रायव्हसी सेटिंग उपलब्ध आहेत. त्याचा आपण योग्य असा वापर करू शकतो. आपण समाजात राहताना इतरांचा गैरसमज होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे स्टेटस चा योग्य वापर करून आपण आपली एक प्रतिमा तयार करू शकतो ती प्रतिमा निश्चितच वाईट होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करावा.
👇👇👇
हे हि वाचा
शेयर मार्केट मध्ये सामान्य माणसाने गुंतवणूक करावी का ?
कोकण किनारपट्टीची शान,आष्टागाराचा राजा - कुलाबा किल्ला, अलिबाग!
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? मराठी,सेमी इंग्रजी कि,इंग्रजी?
मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी?
To download or learn more about Aero WhatsApp, visit the official page for Aero WhatsApp APK.
ReplyDelete