![]() |
PINK VIRUS SCAM ALERT |
अशा लिंकवर कोणीही बिल्कुल क्लिक करू नका पण,जर झालीच असल्यास तर,घाबरून न जाता खालील कृती लगेच करा..
1)प्रथम Setting मध्ये जा.
2)मग App Management मध्ये जा.
3) pink WhatsApp (गुलाबी रंगाचा) आयकॉन असलेले व्हाट्सअप पहा.
4)त्यात जाऊन तेथे data आणि clear cache दोन्ही करा.
5) गुलाबी रंगाचे व्हाट्सॲप हे install झालेले फेक ॲप लगेचच uninstall करा.
6) ब्राउझर मध्ये APP ची डाऊन लोड झालेली फाईल डिलीट करा.
6)शेवटी आपण ज्या ब्राऊसर वरून ॲप डाउनलोड केले तेथील ही history clear करून,काढून टाका.
आज जी पिंक व्हॉट्सअप लिंक धुमाकूळ घालतेय तीची सुरवात सुमारे दोन वर्षांपूर्वीच एप्रिल 2021 मध्ये झाली होती.परंतु या डोकेदुखी लिंक किंवा व्हायरसने परत एकदा मान वर काढली आहे.पिंक व्हॉट्सॲप ही लिंक ॲप चे मेकओवर नसून ते एक मालवेअर आहे.
![]() |
AUTO SEND MESSEGE |
मालवेयर म्हणजे काय?
संगणक किंवा संगणक,मोबाईल नेटवर्क ला खराब करणारे एक सॉफ्टवेयर आहे.हा एक प्रकारचा व्हायरस आहे.
काय होते अप डाऊन लोड केल्यावर ?
पिंक व्हॉट्सअप डाऊनलोड केल्यानंतर ते विविध प्रकारच्या परवानगी मागते जसे की टेक्स्ट मेसेज कॉल लॉक लोकेशन कॅमेरा इत्यादी आणि एकदा का आपण त्याला परवानगी दिली की मग हे ॲप किंवा व्हायरस आपल्या परस्पर सर्व ग्रुप मध्ये सदर पिंक व्हॉट्सअप लिंक चा मेसेज पाठवत राहते ज्याला आपण काहीही करून थांबू शकत नाही जोपर्यंत आपण सेटिंग मध्ये जाऊन त्याच्या परवानगी मध्ये बदल करत नाही किंवा ते ॲप अनइन्स्टॉल करत नाही.
आपल्या परस्पर एखाद्या अँप न कार्य करणे हे अत्यंत घातक असून ते परस्पर आपले सेव केलेले पासवर्ड आपल्याला आलेले मेसेज आपला काही पर्सनल डाटा आपले व्हिडिओ सुद्धा वापरून आपली आर्थिक नुकसान करू शकते किंवा एखाद्या वेळेस आपले आपल्याला ब्लॅकमेल ही करू शकते.
![]() |
Pink WhatsApp Scam Alert! |
खबरदारी कशी घ्यावी
WhatsApp हे जगभरातील लाखो लोक वापरत असलेले लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.याचाच गैरफायदा घेण्यासाठी या व्हायरस ची निर्मिती काही कुप्रवृत्तीच्या व्यक्तींनी केली आहे. या प्रकारच्या लिंक सहसा फिशिंग प्रयत्न आणि घोटाळ्यांशी संबंधित असतात, जे अज्ञानी,भोळ्या,लालची मानसिकता असणाऱ्या वापरकर्त्यांना फसवण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. तथापि, काही सोप्या परंतु प्रभावी धोरणांचा अवलंब करून, आपण अशा धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या वैयक्तिक माहितीचे रक्षण करू शकता. या ब्लॉगमध्ये, आपण पिंक व्हाट्सएप लिंक्स हाताळण्यासाठी आणि तुमची ऑनलाइन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काय काय खबरदारी घ्यावी याचा मागोवा घेऊ व भविष्यात अश्या प्रकारची चूक परत होणार नाही याची काळजी कशी घ्यावी हे पाहू.
1. अज्ञात लिंक विषयी सावधगिरी:
पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे अज्ञात किंवा संशयास्पद संपर्कांकडून संदेश प्राप्त करताना सावधगिरी बाळगणे. अपरिचित किंवा अनपेक्षित दिसणार्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी https:// आहे का खात्री करा, विशेषतः जर तो मोहक ऑफर किंवा बक्षिसे ऑफर करण्याचा दावा करत असेल. Http ज्यामध्ये s नाही ती सुरक्षित नसते.
2. Play Store चा वापर :
जर तुम्हाला एखाद्या ज्ञात संपर्काकडून लिंक असलेला संदेश प्राप्त झाला असेल तर त्यावरून अप डाउनलोड न करता अधिकृत play Store वरुनच करा.
3.परवानगी :
ॲप आपल्याला इंस्टॉल केल्यावर केमेरा, टेक्स्ट मेसेज रिडिंग, लोकेशन, कॉल लॉग, कॉन्टॅक्ट यांची परवानगी मागतात, ते देणे त्या ॲप ला योग्य आहे का याचा नीट विचार करा.
उदाहरणार्थ. एखाद्या game ला तुमच्या कॉल लॉग ची परवानगी का द्यावी????
4. सुरक्षित लिंक ओळखणे:
कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, संपूर्ण URL पाहण्यासाठी त्यावर नजर फिरवा. लिंक अधिकृत वेबसाइटशी जुळत असल्याची खात्री करण्यासाठी त्याचे काळजीपूर्वक परीक्षण करा. फिशिंग लिंक्समध्ये अनेकदा चुकीचे शब्दलेखन, अतिरिक्त वर्ण किंवा डोमेन समाविष्ट असतात जे मूळसारखे असतात परंतु थोड्या फरकांसह.
उदाहरण..
Amazon.com ऐवजी Amaz0n.com
5. अधिकृत दिसणार्या संदेशांपासून सावध रहा:
दंड टाळण्यासाठी किंवा नवीन ऑफर्स साठी तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करणारे, WhatsApp वरूनच असल्याचा दावा करणाऱ्या संदेशांपासून सावध रहा. WhatsApp क्वचितच असे संदेश थेट वापरकर्त्यांना पाठवते. त्याऐवजी, वैध अपडेट्स किंवा घोषणा तपासण्यासाठी अधिकृत WhatsApp वेबसाइट अप स्टोअरला भेट द्या.
6. तुमचे व्हॉट्सॲप अपडेटेड ठेवा:
तुमचे व्हॉट्सॲप अप्लीकेशन नियमितपणे अपडेट करणे अत्यावश्यक आहे.जेणे करून वेळोवेळी आलेल्या त्रुटी दूर केलेले व्हॉट्सॲप सुरक्षित व आद्यायावत राहील.
7. सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा:
तुमच्या डिव्हाइसवर प्रतिष्ठित सुरक्षा सॉफ्टवेअर, जसे की अँटीव्हायरस किंवा अँटी-मालवेअर इंस्टॉल करा. ही साधने फिशिंग प्रयत्नांसह संभाव्य धोके शोधू शकतात आणि प्रतिबंधित करू शकतात, संरक्षणाचा अतिरिक्त स्तर प्रदान करतात.
8. स्वतःला शिक्षित करा:
सामान्य फिशिंग तंत्र, घोटाळे आणि सुरक्षितता सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती मिळवा. ऑनलाइन सुरक्षिततेच्या नवीनतम ट्रेंडबद्दल नियमितपणे स्वतःला शिक्षित करा. फिशिंग प्रयत्नांच्या चेतावणी चिन्हांसह स्वतःला परिचित करा, जसे की वैयक्तिक माहितीसाठी विनंत्या, तातडीच्या मागण्या किंवा संशयास्पद संलग्नक आणि लिंक.
मानसिकता बदला
भारतात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त असून डिजिटल पायाभूत ज्ञान खूपच कमी आहे. स्मार्टफोन च्या माध्यमातून लोकांची भोळ्या, अज्ञानी लालची व फुकट्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो.लोकही वारंवार सूचना देऊन,सोशल मीडीयाद्वारे माहिती प्रसारित करून परत परत त्याच चुका करतात.दुसऱ्यांच्या अनुभवातून काही तरी शिकले पाहिजे पाहिजे ही मानसिकता अजून तरी दिसून येत नाही व स्वतः वाईट अनुभवला सामोरे जातात.
खालील काही उदाहरणे पहा..
1) जामतारा scam सारखे लेख,web series, सिनेमा येऊन अजूनही बँकेचे पासवर्ड सहज शेअर करून स्व:ताचे बँक अकाउंट खाली करून घेतात.
2)Amazon, Flipkart,jio ,Tata कंपनीच्या कूपन फेक लिंक पाच-पाच व्हॉटस्अप ग्रुपला पाठवतात.
3)देवाच्या नावाने आलेले 'हा मेसेज पाच ग्रुपला पाठवा चांगली बातमी मिळेल' हे मेसेज गृपाला फॉरवर्ड करताना दिसतात.
4)Http आणि https यातील साधा फरक न ओळखता सरळ लिंक ओपन करतात.
![]() |
Http ऐवजी https असावे व LOCK चे चिन्ह असावे |
जो पर्यंत आपली मानसिकता आपण बदलत नाही व थोडेफार update राहत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे.
निष्कर्ष
Pink WhatsApp लिंक्स आणि इतर फिशिंग प्रयत्नांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दक्षता, संशय आणि ज्ञान यांचा मिलाफ आवश्यक आहे. या लेखात वर्णन केलेल्या धोरणांचा अवलंब करून, तुम्ही घोटाळ्यांना बळी पडण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकता, तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकता आणि सुरक्षित ऑनलाइन राहू शकता. लक्षात ठेवा, तुमची ऑनलाइन सुरक्षा तुमच्या हातात आहे, त्यामुळे माहिती मिळवा, सावध रहा आणि चिंतामुक्त व्हाट्सएप अनुभवाचा आनंद घ्या.
अधिक माहिती साठी येथे click करा
👇👇👇
हे हि वाचा
स्टेटस ठेवताय? अगोदर हे लक्षात घ्या...
कोकण किनारपट्टीची शान,आष्टागाराचा राजा - कुलाबा किल्ला, अलिबाग!
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? मराठी,सेमी इंग्रजी कि,इंग्रजी?
मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी?
To download or learn more about Aero WhatsApp, visit the official page for Aero WhatsApp APK.
ReplyDelete