कोकण किनारपट्टीची शान,आष्टागाराचा राजा - कुलाबा किल्ला, अलिबाग!

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शत्रूचा खास करून अरबी व पोर्तुगीज यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक समुद्री किल्ल्यांचे, लढाऊ जहाजांचे व आरमाराचे निर्माण केले, म्हणूनच जेव्हा आपण google वर आपण FATHER OF INDIAN NAVY असे search करतो तेव्हा google  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते व हि एक प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.

कुलाबा किल्ला, अलिबाग!
कुलाबा किल्ला, अलिबाग!


   

असे अनेक किल्ले आहेत जिथे गेल्यावर अनेक प्रश्न पडतात.जसे जागा कशी निवडली असेल? एवढे मोठे दगड समुद्रात कसे आणले असतील? किल्ला एवढा मजबूत कसा ? …….असे अनेक प्रश्न …मनात येतात.

MAIN GATE,DOOR
मुख्य दरवाजा 




आज एका अश्याच किल्ल्याची माहिती पाहणार आहोत जो आजही समुद्रात तटस्त उभा आहे.अतिशय सुंदर असा किल्ला जो मुंबई पासून फक्त 35 किलोमीटर असलेल्या अलिबागला आहे. कोलाबा किंवा कुलाबा या नावाने ओळखल्या जाणारा हा किल्ला अतिशय सुंदर आहे ज्याचे फोटो पाहून तुम्ही नक्कीच त्याच्या प्रेमात पडाल.हा एक कोकणातील अतिशय लोकप्रिय समुद्री किल्ला असून लाखो पर्यटक येथे दरवर्षी भेट देतात. 

तोफ 

दिपमाळ 

तोफ 

भवानी मंदिर 

अवशेष 

तलाव 


शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला व त्याचे मजबुतीकरण केले. महाराजांच्या मृत्यू नंतर संभाजी महाराजांनी १६८१ निर्मिती केली असा उल्लेख आहे. अलीबाग ची समुद्री किनार पट्टीला आष्टागार असे  संबोधतात तर कुलाबा किल्याला आष्टागाराचा राजा असेही म्हणतात.कोलाबा किल्ला ब्रिटिश जहाजांवरच्या हल्ल्यांचे केंद्र बनला होता. १७१३ला पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी कुलाबा किल्ल्यासह  एका करारानुसार कान्होजी आंग्रे यांना अनेक किल्ले देण्यात आले.त्यांनी ब्रिटिश जहाजेवर छापे घालण्यासाठी कुलाबा किल्ल्याचा वापर केला. कान्होजी आंग्रे यांनी 16 व्या शतकात, मराठ्यांचे नेतृत्व केले. ज्यांनी नौदल सेनापती म्हणून प्रमुख भूमिका बजावली होती.



अलिबाग 

किल्ल्यावर जाण्यासाठी नाव 

किल्ल्यावरील गणेश मंदिर 

तलाव भिंत 

गणेश मंदिर 


छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा नौदलाची स्थापना केली आणि कान्होजी आंग्रे यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली. कान्होजी आंग्रे यांनी इंग्रजी, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच नौदल सैन्याविरुद्ध मराठा नौदलाच्या प्रदेशाचे प्रभावीपणे रक्षण केले आणि अरबी समुद्रातील मराठा नौदलाचे वर्चस्व सुरक्षित ठेवले. त्यांनी परकीय आक्रमणे यशस्वीपणे परतवून लावली आणि मराठा नौदलाच्या हिताचे रक्षण केले.कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ले करून नौदलाची सुरुवात केली. अनेक प्रयत्न करूनही कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या नौदलाचा पराभव करण्यात इंग्रजांना अपयश आले.अखेर कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व शेवटी इंग्रजांनी मान्य केले व त्यांच्या बरोबर तह केला. कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कुलाबा किल्ल्यात 4 जुलै 1729 ला झाला.

   


माहिती फलक 

तुळशी वृंदावन 

गणेश मंदिर 

घरे




कुलाबा हा अतिशय सुंदर आणि निवांत असा किल्ला आहे. मुंबई पासून जवळ असल्याने तेथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. समुद्राला भरती असली तर किल्ल्यात जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो नाहीतर एरवी पर्यटक घोडागाडी किंवा पायीही किल्ल्यात जाऊ शकतात. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याकडे असून एक स्मारक म्हणून घोषित केला आहे. किल्ल्यात जाण्यासाठी वीस रुपये पुरातत्व खात्याचे तिकीट आहे. किल्ल्याचे मुख्य द्वार अजूनही साबूत असून अतिशय सुंदर आहे. किल्ल्याच्या आत मध्ये काही निवासस्थानाचे बदना अवशेष आहेत तर एक भला मोठा अतिशय सुंदर तलाव आहे. चारी बाजूला समुद्राने वेढलेला असला तरी येथील विहिरींना गोडे पाणी आहे. किल्ल्याच्या आत  भवानी देवीचे मंदिर व व एक गणपतीचे अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा सुद्धा आहेत.


किल्ल्याचा पश्चिमेकडे दर्या दरवाजा आहे. यशवंत दरवाजा असेही म्हणले जाते. हा दरवाजा अतिशय सुंदर असून त्यातून दिसणारे समुद्राचे दृश्य अतिशय अप्रतिम आहे.या ठिकाणी मन एवढे जमते की त्या ठिकाणी ती दृश्य कितीतरी वेळ पहात बसावे असे वाटते. किल्ल्याला चारी बाजूंनी असली तटबंदी अजूनही मजबूत आहे. किल्ल्यावरील बुरुजही साबित आहेत. किल्ल्यावरील काही तोफा आजही दिमाखात उभ्या आहेत.




दर्या दरवाजा 



का येतात लाखो पर्यटक ?

दर्या दरवाजा पश्चिम 




1. ऐतिहासिक महत्त्व: अलिबाग किल्ल्याला महत्त्वपूर्ण ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचे मूळ 17 व्या शतकात आहे. परकीय आक्रमणांविरूद्ध तटीय संरक्षण प्रणालीचा एक भाग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संरक्षणाखाली हा बांधला गेले. किल्ल्या पाहिल्यावर मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा शोध घेता येईल आणि त्याच्या स्थापत्य कलेचा अभिमान वाटेल. 


2. वास्तुशास्त्र : किल्ल्याची वास्तू मराठा आणि युरोपीयन शैलीचे आकर्षक मिश्रण आहे. उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये भक्कम भिंती, बुरुज, मुख्य दरवाजा आणि गोड्या पाण्याची विहीर यांचा समावेश आहे. किल्ल्यातील गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले प्रवेशद्वार आणि विविध वास्तू त्या काळातील अभियांत्रिकी ज्ञानाचे उदाहरण देतात. याव्यतिरिक्त, किल्ला अरबी समुद्राचे विहंगम दृश्य देते, त्याचे दृश्य आकर्षण वाढवते.


3. निसर्गरम्य ठिकाण: अलिबाग किल्ला एका खडकाळ बेटावर अरबी समुद्राच्या निर्मळ पाण्याने वेढलेला आहे. आकाशी समुद्र आणि वालुकामय किनाऱ्यांमधली त्याची रमणीय ,मनमोहक वातावरण निर्माण करते. कमी भरतीच्या वेळी, किल्ल्यावर पायीच प्रवेश करता येतो, त्याच्या परिसरात पोहोचण्यासाठी एक अनोखा आणि साहसी अनुभव मिळतो.


4. किनारपट्टीची दृश्ये: किल्ला किनारपट्टीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते , ज्यामुळे पर्यटकांना विशेषत: सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी, खरोखर मंत्रमुग्ध करणारे आहेत. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांना अलिबाग किल्ला हे किनारपट्टीचे सौंदर्य टिपण्यासाठी एक आदर्श ठिकाण वाटते.


5. इतर सुविधा : किल्ल्याचा शोध घेण्याबरोबरच, अलिबाग पर्यटकांना अनेक संधी आहेत.तुम्ही जवळच्या अलिबाग बीचवर आराम करू शकता, थरारक वॉटर स्पोर्ट्समध्ये गुंतू शकता, कुटुंब आणि मित्रांसोबत आनंददायी पिकनिकचा आनंद घेऊ शकता किंवा समुद्रकिनाऱ्यावरील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट स्थानिक पाककृतींचा आनंद घेऊ शकता.


6. जवळची आकर्षणे: अलिबागमध्ये अलिबाग बीच, कनकेश्वर फॉरेस्ट, वरसोली बीच, लोकप्रिय काशीद बीच व जंजिरा किल्ला यासह इतर अनेक पर्यटन आकर्षणे आहेत. 




मुंबईहून फक्त 35 किलोमीटर आहे तिकडे जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे गेट ऑफ इंडिया पासून मांडवापर्यंत फेरी बोट असून त्यातूनही आपण जाऊ शकतो किंवा स्वतःचे वाहन असल्यास सरळ पनवेल वरून रस्ता अलिबागला येतो. ते राहण्यासाठी अनेक रिसॉर्ट व हॉटेल्स अतिशय कमी खर्चात उपलब्ध आहेत. या किल्ल्याला आपण नक्की भेट द्या.


अधिक माहिती साठी पुढील site ला visit करा कुलाबा




हे वाचा 👇👇👇



Read More



उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वात स्वस्त कोकणातील पाच लोकप्रिय समुंद्र किनारे ! 



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.