मुलांना चांगल्या सवयी कश्या लावाव्यात? How to develop good habits in children?


मुलांमध्ये चांगल्या सवयी लागू करणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. या चांगल्या सवयी लहानवयात लावणे सोपे असते व शक्यही असते.चांगल्या सवयी विकसित केल्याने मुलांच्या जीवनातील विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो, ज्यात शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक विकास आणि एकूण आनंद यांचा समावेश होतो. चांगल्या सवयी असणे हे निरोगी व सुदृढ जीवन जगण्यासाठी खूपच उपयुक्त असते.







मुलांना चांगल्या सवयी कश्या लावाव्यात?


चांगल्या सवयींचे जीवनात महत्व


1. चांगले शारीरिक आरोग्य: नियमित व्यायाम, निरोगी खाणे आणि पुरेशी झोप यासारख्या चांगल्या सवयी आपल्याला चांगले शारीरिक आरोग्य राखण्यास, जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास आणि आपले एकंदर जीवनमान सुधारण्यास मदत करू शकतात.


2. उत्तम मानसिक आरोग्य: सजगतेचा सराव करणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि तुम्हाला आवडणारे छंद किंवा खेळ यासारख्या सकारात्मक सवयी तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यात मदत करू शकतात.


3. नियोजनबद्धता : दिवसाचे नियोजन आणि आयोजन करणे, ध्येय निश्चित करणे आणि विलंब टाळणे तुम्हाला तुमची उपयुक्ततता वाढविण्यात आणि तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकतात.


4. चांगले नातेसंबंध: समोरच्याचे बोलणे पूर्णपणे एकाने व समजून घेणे,, प्रभावी संभाषण, संप्रेषण आणि दयाळूपणा आणि सहानुभूती दाखवणे तुम्हाला इतरांसोबत मजबूत आणि अधिक अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यात मदत करू शकतात.


5.आनंदी व समाधानी जीवन : कृतज्ञ भावना बाळगणे, वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे आणि तुम्हाला आनंद देणार्‍या घटना,क्रिया करणे  व त्यांचा पाठपुरावा करणे यासारख्या सकारात्मक सवयी अंगीकारून तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाची आणि परिपूर्णतेची भावना वाढवू शकता.


सारांश,

 चांगल्या सवयींचा आपल्या जीवनातील विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला अधिक आनंदी, निरोगी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत होऊ शकते.




चांगल्या सवयी
GOOD HABITS

चागल्या सवयी मुलांना कश्या लावाव्यात?


1)आहार, व्यायाम व झोप : 

  >आहार 

लहान मुले बऱ्यापैकी आपल्या पालकांच्या आहाराच्या सवयी बघूनच शिकत असतात. आपण त्यांच्यासमोर सर्व पदार्थ खाल्ले, पदार्थांच्या बाबतीत आवडीनिवडी ठेवल्या नाहीत तर आपली मुले पण आपले पाहून त्यानुसारच आहार घेतात आपण जर आहारात आवडीनिवडी ठेवल्या तर लहान मुलेही पालकांचं बघूनच त्यांच्या आहारात पण आवडीनिवडी ठेवतात त्यामुळे दररोजच्या आहारात आपण सर्व पदार्थ घेतले पाहिजे आणि मुलांना पण तीच सवय लावली पाहिजे.


   >व्यायाम

व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण स्वतः व्यायाम करणे गरजेचे आहेतसेच व्यायामाचे महत्त्व व फायदे सांगितले पाहिजे. व्यायाम करताना जर एरोबिक्सब,झुम्बा डान्स यासारखे पर्याय मुलांना खूप आवडतात किंवा इतर व्यायाम प्रकार करताना संगीताच्या तालावर करावयास सांगणे ,आपणही त्यांच्याबरोबर व्यायाम केल्याने त्यांच्यात नक्कीच व्यायामाची आवड निर्माण होईल

   >झोप

झोप ही मुलांच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे मात्र आजकाल तर पालक रात्री मोबाईल घेऊन बसतात ,सोशल मीडियावर वेळ घालवतात त्यामुळे झोपेची वेळ टळून जाते त्यामुळे उशिरा झोपणे व उशिरा उठणे हे नित्याचेच झाले आहे.शक्यतो आपण रात्रीचे जेवण लवकर करून लवकर झोपावे त्यामुळे आपली मुले आपलंच अनुकरण करतील. घरात सर्वांनी एक नियम पाळायचा रात्री कोणीही मोबाईल गरजे शिवाय वापरायचा नाही.


2)नियमित अभ्यास करणे:

      शक्यतो पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांच्या जवळ बसून त्यांच्याकडून लक्ष देऊन रोजचा अभ्यास पूर्ण करून घ्यावा त्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करायला सांगून त्यानुसार अभ्यास करतात का त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे त्यावेळी पालकांनी खालील काळजी घ्यावी. घरात शांतता राखावी. मुलांच्या शेजारी बसून मोबाईल पाहत बसू नये. घरातील t v बंद ठेवावा. शक्य असेल तर त्यांच्यासाठी छोट्या छोट्या टेस्ट तयार करून सुट्टीच्या दिवशी सोडवून घ्याव्यात , आपल्या मुलाने शाळेत मिळवलेले यश पाहुण्यांना आवर्जून सांगणे , त्यांना कमीपणा वाटेल असे बोलू नये, दुसऱ्यांच्या मुलांशी तुलना करू नये , त्यांच्या आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी त्याबरोबर बोलू नयेत लहानपणापासूनच नियमित अभ्यासाची सवय लावावी. वेळेवर अभ्यासाला बसणे, ठरावीक जागेवर अभ्यासाला बसणे, ठरावीक वेळ जसे एक तास किंवा दोन तास नियमित अभ्यासाला बसणे.ठराविक दिलेले ध्येय वेळेत पूर्ण करणे हे लक्ष ठेऊन करून घेणे.या सवयी लागत नाही तो पर्यंत आपण स्वतः लक्ष ठेऊन नियमित अरुण घेणे. असेच नियमित चालू ठेवल्यास काही दिवसांनी या सवयी होऊन जातात. नंतर फक्त त्यांचा पाठपुरवठा चालू ठेवावा. 



  3)वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे: 

  मुलांना लहानपणीपासूनच नियमित अंघोळ कराने,नखे कापणे, केस कापणे, स्वच्छ कपडे घालणे, दोन वेळा सकाळी व झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासणे,केस विंचरणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे ,सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे,उघड्यावरील अन्न ,पाणी न पिणे या सर्व सवयी आपण लहान पाणी त्याला लावाव्यात व त्याचा पाठपुरवठा करावा.नियमित पाठ्पुरावाठ्याने या सर्व सवयी आपोआप मुलांना लागतात. सार्वजनिक स्वच्छता व एक स्वच्छतेचे सवयी मुले पालकांचे पाहण्याचा अनुकरण करतात. त्यामुळे शक्यतो आपण स्वच्छता राखताना मुलही आपल्या अनुकरण करतील अशा गोष्टी कराव्यात जेणेकरून एक भावी आदर्श नागरिक आपण तयार करू.उदाहरणार्थ, एखाद्या चॉकलेट किंवा बिस्कीट यांचे पॅकेट फोडल्यानंतर ते पॅकेट इतरत्र कोठेहि न फेकता आपल्यात जवळ ठेवावे बँगेत ठेवावे किंवा खिशातही ठेवू शकतो आणि योग्य ठिकाणी टाकावे अशी सवय आपण स्वतःला लावली तरच आपली मुले तीच सवय स्वतःला लावून घेतील.


 

4)थोरा-मोठ्यांचा आदर करणे:

           घरात येणारे पाहुणे, घरातील आज्जी-आजोबा,शेजारी अश्या थोर मोठ्या बद्दल नेहमी आदराने वागणे, त्यांना नियमित बोलणे,नमस्कार करणे, प्रसंगी पाया पडणे.या सवयी आपणच कृतीतून लहानपणीच लावून घेणे.

          मुले ही अनुकरणप्रिय असतात तुम्ही जसं तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी वागणार तेच पाहून मुलंही त्यांच्याशी तसेच पद्धतीने वागणार त्यामुळे आपण आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींची आदराने बोलणे त्यांना योग्य तो मानसन्मान देणे या गोष्टी काळजीपूर्वक मुलांच्या समोर केल्या पाहिजे तरच मुलं आपली त्यानुसार अनुकरण करतील.


5)संभाषण: 

एखादा बोलत असेल तर त्याचे म्हणणे पूर्ण  ऐकून घेणे ,समजून घेणे, विचारपूर्वक उत्तर देणे,व आजी आजोबा ,शेजारी नातेवाईक यांच्याशी सौजन्यपूर्ण भाषेत बोलणे .आजारी माणसांची विचारपूस करणे या सवयी आपण लावाव्यात , त्याच्याकडून त्या वारंवार करून घ्यावात म्हणजे त्या त्यांच्या अंगवळणी पडतात.


6) दया भावना: 

गरीब मुक्या प्राण्याविषयी दया भावना ठेवणे,आजारी माणसांची सेवा करणे, लहान मुलांची प्रेमाने व आदराने वागणे अशा प्रकारच्या सवयी त्याच्या मध्ये रुजवाव्यात.आपण स्वतः जर प्राण्यांविषयी दयाभाव ठेवला तर आपली मुले ही प्राण्यांविषयी त्यावर ठेवतील यात शंका नाही मात्र संस्कार करताना काही गोष्टी खूप काळजीपूर्वक करावे लागतात जसे की गरिबांना मदत करताना आपण आपल्या मुलांना बरोबर घेऊन जाणे त्यांच्या हाताने मदतीचे साहित्य गरीब लोकांना देणे एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न मुलांच्या हातून देणे किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत करणे याच्यातूनच मुले बरच काही शिकून जातात.   


7)आहे त्यात समाधान मानाने: 

   आहे त्या गोष्टी वस्तूंचे योग्य वापर करणे दुसऱ्या कडील वस्तू पाहून असमाधानी राहू नये अशा प्रकारे त्याला व्यवस्थित समजून सांगणे.आपल्याही गरजा मर्यादित ठेवाव्यात जेणेकरून मुल ही तसेच लक्षात घेऊन अनुकरण करेल.


8)वर्तमानात जगणे : 

     वर्तमान काळात जे चालू आहे त्याचा आनंद घेणे. ज्या घटना चालू आहेत त्या व्यवस्थितपणे उपभोग घेतात भविष्यकाळात किंवा भूतकाळात खूप वेळ न रमणे या गोष्टी त्याला समजून सांगाव्यात तसा तो वागत असेल आणि ते लक्षात आले तर तेव्हाच त्याला ते समजून सांगावे व तसे पुन्हा करू नये असेही सांगावे.सण,वाढदिवस लग्न, इतर सुख दु:खाच्या प्रसंगात आपण आपल्या मुलांना सोबत घेऊन सहभाग घ्यावा.


9)मित्र व खेळ: 

     मित्रा बरोबर खेळायला पाठवावे म्हणजे त्यांचा सामाजिक,भावनिक व  शारीरिक विकास होतो.मोजके पण चांगले मित्र जोपासावेत. त्यांच्याबरोबर विविध प्रकारचे मैदानी खेळ दिवसातून थोड्या वेळ का होईना खेळण्यासाठी त्यांना घराच्या बाहेर मुद्दाम पाठवणे आणि तशी सवय ही लावावी.


10) छंद जोपासणे: 

 त्याला ज्या गोष्टी आवडतात अशा पैकी कोणतीही एखादी गोष्ट आपण शोधून काढणे व त्याला त्याबाबत तो छंद जोपासण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणे. उदाहरणार्थ जर त्याला चित्रे काढायची आवड असेल तर त्याला चित्रकला वही आणून देणे रंग व चित्र काढण्यास प्रोत्साहन देणे जमत असेल तर तसा क्लास ही लावने किंवा छंद वर्ग उपलब्ध असतील तर त्या वर्गास पाठवणे.

   

       अश्या प्रकारे आपण स्वतः काही गोष्टी कृतीतून मुलांच्या निदर्शनास पडतील व अंगवळणी पडतील अशी व्यवस्था करावी.

   

       



वाईट सवयींचा मुलांच्या जीवनावर व आरोग्यावर होणारे परिणाम 



BAD HABIT
BAD HABITS


वाईट सवयींचा मुलांच्या विकासावर,आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. 


1)आरोग्य समस्या:

 वाईट सवयी जसे की जंक फूड खाणे, साखरयुक्त पेये घेणे आणि पुरेसा व्यायाम न करणे यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.


2)खराब शैक्षणिक कामगिरी: 

उशीर करणे, गृहपाठ पूर्ण न करणे आणि वर्गात लक्ष न देणे यासारख्या वाईट सवयींमुळे शैक्षणिक कामगिरी खराब होऊ शकते, ज्यामुळे मुलाच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो.


3)वर्तणुकीशी संबंधित समस्या:

  वाईट सवयी जसे की परत बोलणे, अधिकाराचा गैरवापर करणे, अनादर करणे आणि नियमांचे पालन न करणे यामुळे वर्तनविषयक समस्या आणि समवयस्क आणि प्रौढांसोबत संघर्ष होऊ शकतो.


4)सामाजिक गैरवर्तन :

  असभ्य, आक्रमक किंवा धमकावणे यासारख्या वाईट सवयींमुळे सामाजिक दुरावा निर्माण होतो आणि चांगले मित्र बनवण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे मुलाच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.


5)व्यसनाधीनता:

 धूम्रपान करणे , दारू पिणे आणि ड्रग्ज वापरणे यासारख्या वाईट सवयीने व्यसनाधीन होऊ शकतात, ज्यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतात.



एकंदरीत सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या मुलांना लहानपणीपासून चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. आज कालच्या 5g च्या जमान्यात फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब, व्हाट्सअप यामुळे अनेक गोष्टी मुले लवकर शिकतात व लवकरच वाईट मार्गाला जाण्याची  शक्यता असते त्यामुळे लहानपणीपासूनच त्यांच्यावर लक्ष ठेवून ते जिथे चुकत असेल तिथेच  ती चूक व्यवस्थित दुरुस्त करून त्याला चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. त्याच्या मनावर तसे बिंबवणे खूप आवश्यक झाले आहे. येणारा काळ हा खरंच खूप कठीण असून मुले लवकरच वाईट मार्गाला जाऊ शकतात. आपल्या मुलांना ज्या सवयी लावायच्या त्या सवयी आपण स्वतः आपल्या कृतीतून लावण्याचा प्रयत्न करावा व त्याला वारंवार तश्या सूचना करून त्याचा मागोवा नेहमी घेत राहावा. अश्याने त्याच्या आपोआप त्या सवयी त्याला लागतील असा नेहमी प्रयत्न करावा.

   

वरील सर्व मुद्द्याच्या आधारे लक्षात ठेवावी की मुलांच्या चांगल्या सवयी या त्यांच्या भविष्याचा पाया असतात.









>Visit For More Info

>Also Read👇👇




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.