NoMophobia!
NOMOPHOBIA म्हणजे No Mobile Phone Phobia.
तुम्हालाही खालील गोष्टींची भीती किंवा बेचैनी वाटते का?
1) मोबाईल डिस्चार्ज झाला की बेचैन होणे.
3) नेटवर्क,रेंज गेली की बेचैन होणे.
4) मोबाईल विसरला की बेचैन होणे.
5) सतत स्टेटस पाहणे.
6) सतत व्हॉटस् अप,फेसबुक चेक करणे.
7) सतत रील्स पाहणे.
8) मोबाईल हरवण्याची भीती वाटणे.
9) फोन जवळ नसला की बेचैन होणे
10) मोबाईल बऱ्याच वेळ न पाहिल्यास काहीतरी आपल्या नजरेतून सुटले तर नाही असे वाटणे.
![]() |
NOMOPHOBIA |
वरील सर्व लक्षणे ही नोमोफोबिया ची आहेत.असे असेल तर तुम्हाला मोबाईल चे व्यसन लागले आहे असे म्हणावे लागेल.
अन्न ,वस्त्र ,निवारा या बरोबर मोबाईल कधी आपली मूलभूत गरज झाला हे सुद्धा आपल्याला कळले नाही. मोबाईल शिवाय जगणे ही कल्पना सुद्धा मनुष्य करू शकत नाही एखादे लहान मूल असो किंवा एखादे म्हातारे माणूस असो एकदा का स्मार्टफोनचा नाद लागला की तो सुटणे खूपच अवघड आहे एखाद्या व्यसनाप्रमाणे.
मोबाईलचे व्यसन खरंच अत्यंत घातक आहे व त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला दिसून येतील. आजही बरेचसे मानसोपचार तज्ञांची दवाखाने गच्च भरलेले दिसत आहे. त्याला कुठेतरी नक्कीच मोबाइल जिम्मेदार आहे.
नोमोफोबिया, म्हणजेच "नो-मोबाइल-फोन फोबिया" मोबाइल नसण्याची किंवा ते वापरण्यात अक्षम असण्याची भीती किंवा चिंता वाटणे. जगात सर्वेक्षणानुसार सध्या चार पैकी तीन (75%) व्यक्ती मोबाईल च्या आहारी गेलेले आढळले आहेत. यात अस्वस्थता, घाबरणे आणि डिस्कनेक्शनच्या भावनांचा समावेश होतो ज्या व्यक्ती त्यांच्या स्मार्टफोनपासून विभक्त होतात किंवा जेव्हा ते इंटरनेटवर वापरू शकत नाहीत तेव्हा असे लक्षण दिसतात. नोमोफोबिया अद्याप क्लिनिकल डिसऑर्डर म्हणून ओळखला जात नसला तरी, त्याचा मानसिक आरोग्यावर आणि एकूणच आरोग्यावर होणारा परिणाम निर्विवाद आहे.
![]() |
सतत रील्स पाहण्याचे व्यसन |
नोमोफोबियाची कारणे:
मोबाईल चे व्यसन समजून घेणे….
1. कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन:
आपण इतरांशी संपर्क करण्यासाठी आता what's up, Facebook Messenger या सारख्या real time apps चा वापर वाढला आहे.या मुळे सतत messenger, what's up तपासण्याची सवय लागते.आणि जर आपण network च्या बाहेर आलो तर अस्वस्थ वाटते.
2. माहितीवर अवलंबित्व:
साधी ताप जरी आली तरी आपण google वर search करून ती का आली? याचा शोध घेतो.
स्मार्टफोन आपल्या बोटांच्या टोकावर भरपूर माहिती देतात. बातम्यांपासून ते search engine पर्यंत आपण ज्ञान मिळवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी मोबाईल वर अवलंबून असतो. माहितीच्या या सततच्या प्रवाहापासून डिस्कनेक्ट होण्याची भीती नोमोफोबिया निर्माण करू शकते.
3. गेम्स आणि ॲप :
मोबाईल मध्ये आधुनिक real time गेम्स वाढले आहेत.समोरही ऑनलाईन रिअल खेळाडू असतो त्या मुळे हे गेम्स रंजन होतात. उदा. Pokemon,Rummy, Chess, Ludo,PUBG या सारखे गेम्स व्यक्तीला सतत नवीन टास्क देऊन गुंतवून ठेवतात.
ॲप्स च्या माध्यमातून अनेक कामे सोपी होतात. ऑनलाईन खरेदी, तिकीट बुकिंग,फोटो व्हिडिओ एडिटिंग,फेसबुक, व्हॉट्स ॲप, इंस्टाग्राम, ट्रेडिंग ॲप्स,यासारखे ॲप्स माणसाला सतत गुंतवून ठेवतात. व सवय लागल्यास या पासून दूर जाण्याची भीती निर्माण होते यालाच NoMophobia म्हणतात.
![]() |
चार पैकी तीन व्यक्तींना मोबाईलचे व्यसन आहे! |
नोमोफोबियाचे परिणाम:
1. मानसिक आरोग्यावरील परिणाम:
स्मार्टफोनचा अतिवापर चिडचिड, चिंता, तणाव आणि नैराश्याच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे कधी कधी नैराश्य व एकटेपण जाणवू लागून व्यक्ती चुकीचे निर्णय घेणे,भांडण करणे, गैरसमज करून घेणे, झोप न लागणे.अस्वस्थ वाटणे असे परिणाम जाणवू लागतात.
2. बिघडलेले नाते:
स्मार्टफोनचा जास्त वापर समोरासमोरील संवादात व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे सामाजिक प्रतिबद्धता कमी होते आणि संबंध ताणले जातात. वैयक्तिक परस्परसंवाद कमी होऊन नाते संबंध बिघडवतात.
3. खुंटलेली विचार क्षमता व कार्यक्षमता :
सतत सूचना, सोशल मीडिया स्क्रोलिंग आणि ऑनलाइन विचलनामुळे उत्पादकता आणि फोकसवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवण्यामुळे कोणतेही काम करण्यास उशीर होऊ शकतो आणि महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होऊ शकते.
4. आजार:
मानसिक आजाराबरोबर मोबाईलच्या अतीवापरामुळे शारीरिक आजार ही बळावतात जसे नजर कमजोर होणे, ऐकू कमी येणे, एका जागी बसल्यामुळे वजन वाढणे इत्यादी.
नोमोफोबियावर मात कशी करता येईल?
1. जागरूकता व लक्ष:
आपण नेमके कोणते ॲप्स जास्त वापरतो. कधी बेचैन होतो हे लक्ष ठेऊन ओळखा. त्यावर आपली मानसिकता कशी बदलत येईल याची योजना तयार करून त्याची काळजीपूर्वक अमलबजावीसाठी करा. तुमच्या डिजिटल सवयींबद्दल जागरुकता आणण्यासाठी माइंडफुलनेस तंत्राचा सराव करा आणि निरोगी संतुलनाचे ध्येय ठेवा.
2. डिजिटल डिटॉक्स:
मोबाईल कमीत कमी कसा वापर करता येईल याचा विचार करा. network जास्तीत जास्त बंद ठेवा. ॲप्स चे notification बंद करा. गेम्स uninstall करून इतर मैदानी खेळात किंवा मित्र नातेवाईक यांच्याशी संपर्क वाढवा.कामात मन गुंतवा.
3. मर्यादा :
तुमच्या स्मार्टफोनच्या वापरावर मर्यादा निर्धारित करा. स्क्रीन टाइम ट्रॅक आणि नियंत्रित करणारी ॲप्स वापरा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत "फोन-फ्री झोन" ठरवून त्याची कडाक अंमलबजवणी करा. जेवताना किंवा झोपण्यापूर्वी तुमचा फोन दूर ठेवण्याची सवय लावा.
4. मानवी संपर्कांना प्राधान्य द्या:
समोरासमोरील परस्परसंवादांना प्राधान्य देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि वैयक्तिक संबंध अधिक मजबूत करा. क्लबमध्ये सामील होणे, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे किंवा छंद जोपासणे यासारख्या कृतीवर भर द्या. वास्तविक-जगातील नातेसंबंध वाढवा व कामात व्यस्त रहा. चॅटिंग पेक्षा सरळ फोन करून संवादावर भर द्या.
5. चांगल्या सवयी तयार स्वतःला लावा:
तणाव किंवा कंटाळवाणेपणा घालवण्यासाठी एखादा छंद किंवा इतर कोणताही उपाय करता येईल ते ठरवा.
शारीरिक व्यायाम, माइंडफुलनेस सराव किंवा काहीतरी नवीन काम करण्यात व्यस्त रहा जे तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनवर अवलंबून न राहता आराम,नवनिर्मिती व कार्यक्षमता वाढवतात.
एकंदरीत
आपण मोबाईल च्या किती व्यसनी गेलो आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यावर उपाय योजनाचे नियोजन करणे व कडक अंमलबजवणी करणे गरजेचे आहे.
व्यायाम, meditation, संपर्क ,चर्चा,संवाद वाढवणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त कसे ऑफलाईन राहू याचा विचार करणे गरजेचे आहे. व वेळीच या NoMophobia वर मात करणे गरजेचे आहे.
अधिक माहिती साठी येथे click करा 👇
NOMOPHOBIA: NO MObile PHone PhoBIA
👇👇👇
हे हि वाचा
शेयर मार्केट मध्ये सामान्य माणसाने गुंतवणूक करावी का ?
कोकण किनारपट्टीची शान,आष्टागाराचा राजा - कुलाबा किल्ला, अलिबाग!
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? मराठी,सेमी इंग्रजी कि,इंग्रजी?
मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी?
मुलांना चांगल्या सवयी कश्या लावाव्यात?
👍
ReplyDelete