10 दिवसीय विपश्यना शिबीर कसे असते ? TEN DAY VIPASSANA COURSE- MARATHI

विपश्यना हे एक ध्यान तंत्र आहे ज्याचा भारतात हजारो वर्षांपासून सराव केला जात आहे आणि गेल्या काही दशकांमध्ये ते पश्चिमेत अधिकाधिक लोकप्रिय झाले आहे. विपश्यना हा पाली शब्द आहे ज्याचा अर्थ “अंतर्दृष्टी” किंवा “गोष्टी जशा आहेत तशा पाहणे.” दहा दिवसाच्या विपश्यना शिबिरात (TEN DAY VIPASSANA COURSE) विपश्यना ध्यान तंत्र अगदी परिपूर्ण शिकवले व अनुभवले जाते.

10 day vipassana course
10 day vipassana course

भारतात हे शिबिरे S. N . GOYANKA यांनी स्थापन केलेल्या Vipassana Research Institute (VRI) मार्फत राबवले जातात. विपश्यना शिकण्यासाठी किंवा सुरवात करण्यासाठी त्याचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे त्या साठी सुरवात १० दिवसीय शिबिरापासून करावी लागते. हे शिबीर भारतातील अनेक विपश्यना केंद्रा मार्फत राबवले जाते.

विपश्यना कोर्स हा एक आव्हानात्मक आणि परिवर्तनशील अनुभव आहे ज्यासाठी उच्च पातळीची वचनबद्धता आणि शिस्त आवश्यक आहे. सहभागींनी काटेकोर वेळापत्रकाचे पालन करण्यास सहमती दर्शविली पाहिजे, ज्यामध्ये सकाळी 4:00 वाजता उठणे, दिवसातून दहा तास ध्यान करणे आणि अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी आर्य मौन पाळणे समाविष्ट आहे.

आर्यमौन

या दहा दिवसाच्या शिबिरात आर्य मौन पाळणे आवश्यक असते.आर्य मौन म्हणजे दहा दिवस मौन तर पाळावेच लागते पण या व्यतिरिक्त एखाद्याच्या नजरेला नजन न भिडवणे व हाताच्या, डोळ्यांच्या खुणेने देखील आपण इतरांशी संपर्क न करणे. आर्य मौन व्यवस्थित पाळल्या जावे या साठी परिपूर्ण व्यवस्था केंद्र मार्फत केलेली असते. एखाद्या वस्तूची किंवा मदतीची गरज पडल्यास एका ठराविक जागेवर कागद व पेन असतो त्यावर संदेश लिहावा असे आदेश असतात. स्वयंसेवक नंतर संदेश वाचून पूर्तता करतात. तसेच विपश्यने संदर्भात काही अडचण असल्यास दुपारी 12:00 ते 12:30 दरम्यान आचार्य धम्मा हाॅल बसलेले असतात त्या ठिकाणी जाऊन आपण समस्याचे समाधान करू शकता.

धम्माहाॅल

धम्माहाॅल मध्ये ग्रुप मध्ये ध्यान साधना केली जाते समोर आचार्य बसतात व प्रत्येकाला बसायला एक निश्चित जागा असते. ध्यान साधनेसाठी आवश्यक व पोषक वातावरण धम्माहाॅल मध्ये निर्माण केले जाते.

पॅगोडा

पॅगोडा मध्ये वैयक्तिक ध्यान साधनेसाठी छोट्या छोट्या खोल्या असतात. काही ठराविक वेळेसाठी विपश्यना सरावासाठी या मध्ये साधकांना पाठवले जाते.

आचार्य

या कोर्सचे नेतृत्व अनुभवी आचार्य करतात ज्यांनी अनेक वर्षांपासून विपश्यनेचा सराव केला आहे आणि ते संपूर्ण शिबिरादरम्यान सहभागींना मार्गदर्शन व अडचणी असल्यास त्याचे निराकरण करतात.

विपश्यना

अभ्यासक्रमाची सुरुवात तंत्राच्या परिचयाने होते, त्यानंतर अनेक दिवस केंद्रित ध्यान सराव केला जातो.यालाच आनापान साधना असे म्हणतात. सहभागींना त्यांच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि त्यांच्या शरीरातील संवेदनांवर प्रतिक्रिया न देता त्यांचे निरीक्षण करण्याची सूचना दिली जाते.

विपश्यानेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे CLICK करा

वेळापत्रक

दहा दिवशीय शिबिराचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाते.दिवसाची सुरवात सकाळी ठीक 4:00 वाजता होते.स्वयंसेवक हातात एक छोटी घंटी घेऊन दारासमोर वाजवून झोपेतून उठवतात व फ्रेश होऊन 4:30 वाजता ध्यानसाधनेस सुरवात होते.दिवसभर हे ध्यान सत्रे काही ठराविक विश्रांतीसह चालूच असतात.त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

VIPASSANA TIME TABLE
DAILY SHEDULE OF VIPASSANA STUDENTS

नाश्ता व जेवण

  1. सकाळी 6:30 ते 7:15 दरम्यान नाश्ताअसतो ,
  2. दुपारी 11:00 ते 11:45 दरम्यान जेवण असते व
  3. सायंकाळी 5:00 ते 5:30 दरम्यान नाश्ता किंवा लीम्बुपानी असते.
  4. यानंतर जेवन नसते.

राहण्याची व्यवस्था

साधकांना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था केलेली असते. काही ठिकाणी DORMITORY असतात ज्यात प्रत्येकाला स्वतंत्र बेड ची व्यवस्था केलेली असते.

विपश्यना राहण्याची व्यवस्था
ROOMS FOR VIPASSANA STUDENTS




तुम्हाला तुमचा ध्यानाचा सराव अधिक सखोल करण्यात किंवा स्वतःबद्दल सखोल समजून घेण्यात, विकार दूर करून एक समाधानी शांत व संयमी जीवन जगायचे असेल तर विपश्यना शिबीर करावे. अनुभव आव्हानात्मक असला तरी, चांगल्या परिणामासाठी हे प्रयत्न करण्यासारखे आहेत. पुढील लेखात आपण शिबिर साठी नोंदणी कशी करावी ते जाणून घेऊ अधिक माहिती साठी dhamma.org या संकेत स्थळाला भेट द्या.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.