Vipassana- विपश्यना म्हणजे काय?
जीवन जगण्याची एक कला म्हणजेच विपश्यना होय. vipassana technique मानवाचे कौटुंबिक,सामजिक व आर्थिक जीवन जसजसे प्रगल्भ होत गेले तसतसे त्याचा व बौद्धिक व भावनिक विकास ही होत गेला. वाढत्या गरजांबरोबर कालांतराने जीवनातील ताणतणाव वाढत गेला.जीवनातील हे ताणतणाव दूर करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग जसे दारू पासून ते ध्यान साधने सारखे प्रयोग मानवाने केले. त्या पैकीच जीवनातील ताणतणाव दूर करून सुखी समाधनी जीवन जगण्याची एक कला म्हणजेच विपश्यना होय.
अंदाजे 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बद्धांनी विपश्यना ध्यान पद्धतीचा शोध लावला आणि तेव्हापासून विपश्यना जगातील सर्वात लोकप्रिय ध्यान तंत्र बनले असून एक महत्वाची ध्यान पद्धती म्हणून जगभरात प्रचलित झाली आहे. . बौद्ध भिक्खू आणि नन्सपासून ते धर्मनिरपेक्ष अभ्यासकांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी अधिक स्पष्टता आणि अंतर्दृष्टी शोधण्यासाठी हे तंत्र स्वीकारले आहे. पाली भाषेत ‘विपस्सना’ व संस्कृत भाषेत ‘विपश्यना’ ही ध्यान पद्धती गौतम बुद्धांनी शोधलेली आहे. बौद्ध धर्माची हि ध्यान पद्धती ‘विपश्यना’ या नावाने ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय. “विपस्सना’ शब्दाचा अर्थ “स्वतःच्या (मनात) आत डोकावणे” असा पाली भाषेत होतो. गौतम बुद्धाने स्वतःया ध्यानपद्धतीचा सराव केला व तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले व तीची अनुभूती आपल्या शिष्यगणांना दिली.
ही ध्यान पद्धती गौतम बुद्धाने स्वतः आचरली व आत्मसात केली परिमाण जाणवल्यावर तीची अनुभूती आपल्या शिष्यगणांना दिली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर या ध्यानपद्धतीचा प्रसार त्यांच्या शिष्यगणांनी जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार केला. भारतात सुमारे अनेक वर्षे ही ध्यान पद्धती आचरली गेली मात्र परकीय आक्रमण व विविध सत्तांतरे व परिवर्तांच्या काळात हि ध्यान पद्धती लोप पावली. परंतु तो पर्यंत विश्यानेचा प्रसार बऱ्याच शेजारील देशात झाला होता. त्या पैकी म्यानमारमध्ये काही उपासक व शिष्यगणांच्या समुदायाने या ध्यान पद्धतीचा अभ्यास व आचरणे सुरू ठेवले . त्यांपैकी सयागी उ बा खिन या वरिष्ठ उपासक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीने ही उपासना पद्धती अनेकांना शिकवून शिष्य व शिक्षक निर्माण केले. विपश्यना एक प्राचीन ध्यान तंत्र असून अंतर्दृष्टी ध्यान (Insight Meditation) म्हणून ही प्रसिद्ध आहे. या तंत्राचा उगम भारतातच झाला. ही एक आत्मपरिवर्तनाची एक शक्तिशाली पद्धत आहे. याद्वारे प्रत्येकाला स्वतःला व त्याच्या सभोवतालच्या जगाला सखोल समजून घेता येते. विपश्यना एक सगजता आधारित ध्यान सराव आहे.जी एखाद्याचे विचार, भावना आणि शारीरिक संवेदनांसह वर्तमान क्षणाच्या निरीक्षणावर लक्ष केंद्रित करते. जागरुकता आणि समानतेची उच्च भावना जोपासनेच्या उद्देशाने हे सहसा शांत वातावरणात किंवा एखाद्या बंद खोलीत (Hall) केले जाते.

अनापान साधना:
अनापान साधना हा एक विपश्यनेचा भाग आहे. विपश्यना प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी अणापान साधनेचा सराव करतात. यामध्ये मुख्यतः आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. डोळे बंद करून श्वासावर फक्त लक्ष ठेवावे लागते.त्यात कोणताही बदल करू नये. नाक व वरच्या ओठाच्या वरचा भाग या मधील जो त्रिकोणी भाग आहे त्या भागावर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्मपणे श्वासाचे निरीक्षण करावे.सुरवातीला मन खूप भटकते पण त्याला वारंवार जाग्यावर अनावे.बऱ्याच वेळ सराव केल्यावर मन शांत व अतिसूक्ष्म होते. मन अश्या सूक्ष्म अवस्थेवर पोहचल्यावर विपश्यना सुरू करता येत.
विपश्यना : VIPASSANA
एखादी गोष्ट जशी आहे तशी पाहणे हा विपश्यना या शब्दाचा अर्थ आहे. स्वतः च्या अंतर्मनात डोकावून मानसिक अशुद्धता व विकार दूर करण्याची एक प्रक्रिया आहे विपश्यना.आनापान नंतर एकदा ध्यान केंद्रित झाल्यावर प्रत्यक्ष विपश्यना सुरू केली जाते. डोळे बंद असताना अन्तरदृष्टी/आत्मनिरिक्षनाद्वारे डोक्याच्या वरच्या भागापासून ते पायाच्या बोटापर्यंत आपल्या वेगवेगळ्या अंगाचे क्रमशः निरीक्षण केले जाते. शरीराच्या वेगवेगळ्या भागात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म संवेदनाचे तटस्थ भावनेने निरीक्षण करण्याचा सराव केला जातो.या संवेदना अनित्य आहेत हे मनावर बिंबवण्याचा सराव केला जातो. याच प्रकारे मनात निर्माण होणाऱ्या राग, द्वेष,मत्सर,लोभ अश्या प्रकारच्या भावना देखील अनित्य अशी संवेदना व भावनांची सांगड घालून त्या अनित्य आहेत त्यांना जश्या आहेत तशा पाहण्याचा सराव केला जातो. सतत सरावाने खूप चांगले बदल अनुभवता येतात.विपश्यनेच्या फायद्यांमध्ये वाढलेली आत्म-जागरूकता आणि भावनिक नियमन, कमी तणाव आणि चिंता, सुधारित एकाग्रता आणि लक्ष आणि इतरांबद्दल सहानुभूती आणि करुणेची भावना यांचा समावेश होतो. वैयक्तिक प्रगती आणि परिवर्तनासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे आणि त्यात एखाद्याच्या जीवनावर आणि नातेसंबंधांवर खोलवर परिणाम करण्याची क्षमता आहे.

विपश्यना तंत्र काळाच्या कसोटीवर उतरले आहे आणि जगभरातील लाखो लोक सराव करत आहेत. वैयक्तिक प्रगती आणि परिवर्तनासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे आणि जे सराव करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी असंख्य फायदे देतात.आपण जर विपश्यना करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी सुरवात एक 10 दिवसीय शिबीर करणे आवश्यक आहे. हे शिबीर भारतात Dhamma organization तर्फे आयोजित केलं जातात. कमीत कमी एक शिबीर केल्याशिवाय विपश्यना समजणे खूप कठीण आहे. फक्त वाचून तर कळणे अवघड आहे.आपण जर शिबीर करू इच्छित असाल तर आम्ही तुमची मदत नक्की करू. पुढील लेखात शिबीर विषयी अधिक सखोल माहिती घेऊयात.अधिक माहिती साठी पुढील लिंक ला भेट द्या http://www.dhamma.org
TEN DAY VIPASSANA COURSE